भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)
लोकसंख्या
वॉर्ड संख्या
मतदार संख्या
कुटुंब संख्या
शाळा/महाविद्यालय संख्या
अंगणवाडी संख्या
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी महाराष्ट्राचा छावा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचे आजोळ महानुभाव पंथांची दक्षिण काशी ऐतिहासिक श्रीमंत नाईक निंबाळकर राज घराण्याची परंपरा असलेले फलटण शहरालगत दक्षिणेस फलटण –गिरवी व उपळवे रस्त्यालगत जाधववाडी (फ)हे गाव आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या ३३१९ इतकी आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यासाठी बंगले व अपार्टमेंटमध्ये राहणेसाठी तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आलेल्या ग्रामस्थांची लोकसंख्या १५३१२ इतकी आहे. गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत फलटण शहराप्रमाणेच खालीलप्रमाणे नागरी सुविधा पुरवीत आहेत. १) पाणीपुरवठा :- गावातील 3000 घरांना नियमित शुध्द पाणीपुरवठा नळपाणीपुरवठा योजनेद्वारे केला जातो. त्यासाठी एकूण २११२३ मीटर पीव्हीसी पाईप दाबनालिका व १२७९०.५० मीटर पीव्हीसी पाईप वितरण व्यवस्थाद्वारे ७६ वॉल द्वारे गावात नियोजनबद्धरित्या पाणीपुरवठा केला जातो. तसेच राष्ट्रीय पेयजल योजना मधून ८.३३ कोटी अंदाजपत्रकाचे काम सुरु आहे. २) घनकचरा व्यवस्थापन :- गावातील सर्व 3000 घरातील ओला व सुका कचरा दररोज ३ घंटागाडीद्वारे संकलित करणेचे नियोजन करून तो नगरपालिकेच्या कचराडेपोवर जमा केला जातो. तसेच प्लास्टिक संकलन घंटागाडी ने गावातील सर्व प्लास्टिक दर शनिवार व रविवारी गोळा करून प्लास्टिक संकलन केंद्र जाधववाडी मध्ये जमा केले जाते. व तेथून प्लास्टिक वर्गीकरण करून त्याचे योग्य विलगीकरण केले जाते. ३) सांडपाणी व्यवस्थापन :- गावातील सर्व विभागात असलेल्या 3000 घरातील सांडपाणी ८२४४ मीटर आर सी सी बंदिस्त गटरला जोडलेले आहे. ४) रस्ते व्यवस्थापन :- गावातील सर्व विभागातील अंतर्गत रस्ते ११०४७ मीटर लांब खडीकरण व डांबरीकरण केलेले आहे. ५) ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभिकरण केलेले असून आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या सर्व सेवा ग्रामस्थांना वेळेत दिल्या जातात. ग्रामपंचायतचे संपूर्ण दप्तर (१ ते ३३ नमुने सह) संगणकीकृत केलेले असून सर्व कामकाज पेपरलेस केले जाते. ६) वृक्षारोपण :- MG नरेगा योजना व ग्रामपंचायत फंड मधून गावातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा, ओपन स्पेस, खाजगी जागा, स्मशानभूमी परिसर या ठिकाणी १२०० झाडांचे वृक्षारोपण करून त्यास ठिबकसिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून वृक्षसंवर्धन केलेले आहे. तसेच गावामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या समोर वृक्ष जोपासना केली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्रयत्न केला आहे. ७) शैक्षणिक सुविधा :- १)गावामध्ये प्राथमिक शाळा १ ते ४ असून विद्यार्थी संख्या ३३ इतकी आहे. २)अंगणवाडी ४ असून विद्यार्थी संख्या ४९७ इतकी आहे.३) फलटण एज्युकेशन संस्थेचे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल असून त्यांचे १ ते १२ पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या २१४१ इतकी आहे. ४) महाराष्ट्र शासन अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या २७ इतकी आहे. ८) आरोग्य सुविधा :- १) गावातील सर्व ग्रामस्थांना २५० मिली. मेडीक्लोर बाटली चे वाटप दरवर्षी एप्रिल मध्ये केले जाते.२) पिण्याच्या पाण्यात दररोज TCL व तुरटीचा वापर केला जातो. ३) पाणी सोडणेपूर्वी OT टेस्ट घेऊनच पाणीपुरवठा केला जातो. ४) गावात ३ महिन्यातून एकदा फॉगिंग मशीनद्वारे जंतूनाशक/ डास उत्पत्ती थांबविणेसाठी फवारणी केली जाते. ५) पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण गावात रस्त्याच्या दुतर्फा व ओपन स्पेस मध्ये गवतावर तननाशक फवारले जाते. ६) गावातील गरोदर माता व स्तनदा माता व लहान मुलांचे लसीकरण साठी स्वतंत्र ANC क्लिनिक रूम इमारत बांधकाम केले असून त्यामध्ये सर्व सुविधा पुरविल्या जातात. ७) ० ते ३ व ३ ते ६ वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली यांची नियमित तपासणी/ लसीकरण करून आहारपुरवठा केला जातो. यासाठी आरोग्य सेविका ,आशा व अंगणवाडी सेविका यांची मदत होते. ८) गावातील सर्व महिलांना सॅनेटरी नॅपकीन देणेसाठी ग्राप.ने ANC क्लिनिकमध्ये वेडिंग मशीन खरेदी केलेली आहे. त्याचा वापर सर्व महिला करतात. ९) दिवाबत्ती व्यावस्थापन :- गावातील सर्व विभागात रस्त्याकडेला रोडलाईटची नियोजनपूर्वक व्यवस्था केलेली असून एकूण ४३२ पथदिवे असून त्या सर्व पथदिव्यांचे रुपांतर LED बल्ब मध्ये केलेले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सोलर लाईटची सुविधा उपलब्ध केलेली आहे. १०) धार्मिक बाबी :- जाधववाडी (फ) गावत श्री. श्री बिरदेव देवस्थान, श्री साई मंदिर, अन्नपूर्णा मंदिर,गणेश मंदीर, श्रीनाथ मंदिर इत्यादी सार्वजनिक देवस्थाने असून यामध्ये सर्व धार्मिक उत्सव मोठ्या भक्तीभावाने सादर केले जातात. वरीलप्रमाणे सर्व सुविधांची परिपूर्ती असलेल्या जाधववाडी (फ) गावाने आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सन २०२०/२१ मध्ये भाग घेऊन रक्कम रु. १० लाख बक्षीस ग्रामपंचायतीला मिळालेले आहे. तसेच माझी वसुंधरा मध्येही मोठ्या उस्फूर्ततेने ग्रामपंचायत जाधववाडी फ ने भाग घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक जिल्ह्यात दुसरा व विभागात तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.